Saturday, February 16, 2019

*#भूजल #पातळी #वाढी #साठी एक #सकारात्मक प्रयत्न -
■शुभ कार्याला प्रत्येक दिवस मुहूर्ताचाच असतो■
       ★#भूजल पातळी वाढवल्या जाणे गरजेचे असून नैसर्गिकरित्या
*१)पावसाचे पाणी
*२) नदी नाल्यांचे वाहणारे पाणी हे अत्यन्त महत्वाचे स्रोत आहेत परंतु मानवी प्रयत्नाने सुद्धा फार प्रचंड प्रमाणात भूजल पातळी वाढवणे सहज शक्य आहे ,त्यापैकी
*अ) जमिनीवरील व छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी व
*ब) प्रत्येक घरातून बाहेर पडणारे व नाल्यातून वाहून जाणारे आपणच वापरलेले पाणी,जसे कपडे धुणे,आंघोळीचे पाणी,जमीन पुसणे ,भांडी घासणे असे सगळे पाणी जे नाल्यातून वाहून जाते.
★असे सगळे  पाणी आपण जमिनीत प्रयत्नपूर्वक सोडू शकतो ,यासाठी छतावरील व घरातील वापरलेले पाणी पाईप द्वारे शोषखड्ड्यात सोडावे.शोषखड्डा ४'×४'×५' या क्षेत्रफळाचा असावा तळाशी २ ड्रिल २० फुटापेक्षा जास्त खोल करावे,खड्ड्यात कोळसा,चुनखडी,गिट्टी ,विटांचे तुकडे टाकावे.घरातील वापरलेले पाणी येथे प्रक्रिया होऊन शुद्ध होईल .हा शोषखड्डा आपल्याकडे बोअरवेल असल्यास बोअरवेलच्या  शोषखड्ड्यापासून ५ फूट दूर असावा. पावसाचे पाणी  या खड्ड्यात जाऊ नये यासाठी खड्डा झाकून ठेवावा.             
★बोरवेल च्या सभोवती ५'× ५' ×५'चा दुसरा खड्डा करावा .बोरवेल च्या केसिंग च्या पाईप ला जमिनीच्या पातळी पासून २' खोल सच्छिद्र करावे.या शोषखड्ड्यात सुद्धा कोळसा,चुनखडी,गोटे,गिट्टी,विटांचे तुकडे भरावे.
★परिसरातील पावसाचे पाणी व छतावरील पावसाचे पाणी पहिल्या शोषखड्ड्यातून गाळले जाऊन बोरवेलच्या खड्ड्यात पोहोचून तेथे पुन्हा गाळले जाऊन बोरवेल द्वारे सरळ बोअरवेलच्या तळाशी जाईल व #भूजल #पातळी अवश्य वाढेल.
★उड्डाण पूल व रस्त्यांवरील वाहून जाणारे व तुंबणारे पाणी शोषखड्डयाद्वारे जमिनीत ४० फूट खोल सोडावे.
★आधी पाणी साठवा व नंतर भरपूर झाडे लावा,प्रत्येक गावाजवळील तलावाजवळ लावलेली झाडे नक्की टिकतील.
★एक लाख #लोकवस्ती असलेल्या शहराचा विचार केला तर प्रति व्यक्ती द्वारे २० लिटर पाणी प्रतिदिन घराबाहेर टाकले जाते म्हणजेच दिवसाला २०लाख लिटर आणि वर्षाला ७३ कोटी लिटर पाणी बोअरवेल च्या माध्यमाने सरळ भूगर्भात पोहोचेल व भूजल पातळी वाढेल.हीच कृती विहिरींच्या बाबतीत करता येईल
★प्रत्येक ग्राम पंचायत,नगरपालिका,नगर परिषद महानगर पालिका यांच्या पुढाकाराने सकारात्मक कृती द्वारे गाव व शहराने हा विचार करण्याची वेळ आली आहे.प्रत्येक #कॉलनी,#सोसायटी आणि #घराने हा जल पुनर्भरणाचा खात्रीलायक प्रयोग करावा,
#आपला #हा #एक #छोटासा #उपक्रम #जागतिक #जलसंकट #दूर #करेल
         *** *■पुढील दहा वर्षात पाणी नसेल,पृथ्वीचं वाळवंट होणार-■
      *असे नकारात्मक विचार करून घाबरण्यापेक्षा आजच आपल्या सोसायटीत,कॉलनीत,शेतात वा घरी असलेल्या विहीर किंवा बोअरवेल सभोवती शोषखड्डा तयार करून छतावरील वाहून जाणारे,घरातील वापरलेले व पावसाचे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जाऊ द्या आणि हर प्रयत्ने रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवा.
*#जलसंकट #टळेल*,मात्र या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची आहे.
    *मी स्वतः माझ्या घरी शोषखड्डयाद्वारे बोअरवेल रिफिल चे काम #यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे*
    *आपण सर्वांनी हा विषय आपला समजून सकारात्मक कृती करावी हीच नम्र विनंती.
     *प्रत्येकाचा हा एक छोटासा उपक्रम #जागतिक #जलसंकट दूर करेल, #जलक्रांती #घडवेल. ही कृती सुरू करण्याआधी अभ्यास करावा व #मान्य असल्यासच काळजी घेऊन पूर्ण करावे. 
*करा तर मग- #मनाची #तयारी.
◆◆◆#काळजी #घ्या◆◆◆
◆★#शेतात वापरलेले #घातक ◆#रासायनिक द्रव्य असलेले पाणी,
◆*घरातील #वापरून बाहेर सोडलेले ◆पाणी,
◆*विविध #व्यवसाय #उद्योगांसाठी ◆वापरून बाहेर सोडलेले पाणी,
◆★#विहीर/#बोअरवेल मधे सरळ सोडू ◆नका.★★★★★★★
◆*यात #धोका असू शकतो ,
◆*त्यामुळे शेती,उद्योग व घरातील ◆वापरलेले पाणी #वेगळ्या शोषखड्ड्यात ◆साठवा.◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★सबमर्सिबल पंप बिघडण्याची अनेक कारणे असतात,ही भीती वाटत असल्यास त्यांनी केसिंग पाईप सच्छिद्र न करता शोषखड्डा जास्त खोल करावा.किंवा बोअरवेलच्या बाजूला वेगळे बोअर करून त्यात जाड रेती,कोळसा भरावा.
◆★फक्त पावसाचे वाहणारे पाणी,रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या पाईप द्वारे छतावरील एकत्रित केलेले व वाहणारे पाणी विहीर/बोअरवेल च्या शोषखड्डया द्वारे भूगर्भात सोडावयास हरकत नाही.
◆★भूजल पातळी वाढवणे हे चांगले कार्य जरी असले तरीही आवश्यक ती काळजी घेणे अत्यन्त आवश्यक आहे.
हे अत्यन्त महत्वाचे आहे
★बँक,पतसंस्थांनी या कामासाठी कर्ज द्यावे.हे एक राष्ट्रीय व जागतिक महत्वाचे कार्य समजावे.या कामाला पावसाळ्याची वाट पाहण्याची गरज नाही.                ★★★★★★               
https://www.facebook.com/groups/542293752830502/   
*कृपया लिंक पर क्लिक करे                   
#सुहास #सोहोनी,       
*#जलक्रांती #अभियान*  मोबा:-9405349354,
  0721-2567463

No comments: