Saturday, February 16, 2019

★#वृक्ष #लागवडी साठी एक आगळा वेगळा उपक्रम ,म्हणजेच #झाडांची #भिशी .
★हा उपक्रम प्रत्येक गावात सुरू करता येईल,हा एक यशस्वी उपक्रम आहे.
★पैशांची भिशी कशी असते हे आपणा सगळ्यांनाच माहिती आहे ,त्याच पद्धतीने एकत्र येऊन ड्रॉ पद्धतीने झाडांची भिशी हा #पर्यावरण #पूरक उपक्रम सुरू झाला तर लोकसहभागाद्वारे वृक्ष लागवड होऊ शकेल.दर महिना ठराविक रकम ठरवून ड्रॉ काढले जातील त्या पैशातून झाडे विकत घेणे, ट्री गार्डस लावणे,त्यांची दुरुस्ती करणे,झाड जळाले तर त्या जागी दुसरे झाड लावणे,पाणी देणे किंवा देखभालीसाठी मजूर लावणे असे खर्च भागतील.
★आपला वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस,प्रिय व्यक्तींचा स्मृतिदिन या निमित्याने सभासद आर्थिक मदत करू शकतील.
★भिशी च्या निमित्याने पर्यावरण प्रेमी #एकत्र येतील.
आपसात #मैत्री होईल,#सुनियोजित #कार्य सुरू राहील,योग्य ठिकाणी #जबाबदारीने झाडे लावली जातील,त्या झाडांची #निगा राखली जाईल त्यामुळे झाडे टिकतील,झाडांची चांगली वाढ होईल.
★भारतीय जमीन व #हवामानानुसार टिकणारी झाडे,जसे,वड,पिंपळ,सिसम,बहावा,कडुनिंब,चिंच,कवठ,आंबा,आवळा अशोक ,देवदार, कदंब असे वृक्ष लावले जावेत.वृक्ष लागवडीचा #उद्देश सफल होईल.
★सभासदांकडून झाडांचे रक्षण,ट्रीगार्ड ची दुरुस्ती केली जावी,महिन्यातून दोनदा झाडांचे निरीक्षण केले जावे.,
अनेक शुभेच्छा,
#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान,
मोबा:-9405349354

*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
★जलक्रांती अभियान हा फेसबुक ग्रुप जॉईन करा★

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354

No comments: