■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■ 💥युद्धासाठी
जनतेचे संपूर्ण सहकार्य लागतं, एकमेकांवर विश्वास हवा,युद्ध केवळ सैनिकच
नाही, तर अवघ्या देशाला लढावं लागतं, जनतेच्या विश्वासावर सैनिकी ताकत वाढत
असते,देशाबाहेरील प्रत्यक्ष शत्रूपेक्षा देशातील देशविरोधी कारवाया करणारे
,जनतेच्या मनोधैर्यावर वार करणारे जास्त धोकादायक असतात. दुर्दैवाने असे
देशात बरेच लोक आहेत आणि ते बुद्धीजीवी,लोकनेते, खेळाडू ,लेखक,पत्रकार,
राष्ट्रीय पुरस्कार विजेते,भडकवलेले दुखावलेले वाहवत गेलेले तरुण
असेे महत्वाचे लोकं आहेत.ह्यांच्याकडे लक्ष देणे हे युद्धापेक्षा जास्त
महत्वाचे आहे,अर्थात सैन्याला या गोष्टी समजतात .युद्ध काळात असंतुष्ट आणि
भ्रष्टाचारी लोकांच्या शोधात शत्रू असतो हे कुणी सांगायची गरज नाही .मला
वाटतं आजची ही वेळ एकी सिद्ध करण्याची आहे ,आपण सुज्ञ आहात. ★सावध रहा
,रात्र वैऱ्याची आहे★
सुहास सोहोनी
No comments:
Post a Comment