निसर्गाचा संगीतकार हरवला आहे
पाऊस आल्या आल्या जमिनीवर आपला हक्क सांगत गवत व गाजर गवत उगवले .झाडांना पालवी व
फुले आली पण अजूनपर्यंत आला नाही तो बेडकांचा सामुहिक गोंगाट .रिमझिम बरसणाऱ्या पावसाळ्यातील
निसर्गचीत्राला सजीव करणार पार्श्वसंगीत देणारा हा सृष्टीचा कलाकार आहे तरी कुठे ?निसर्गाच्या जीवनचक्रातील
महत्वाचा घटक असलेला हा इवलासा जीव हरवला आहे .नामशेष होण्याच्या मार्गाला लागलेला तर नाही ?
जगभर किटकनाशके आणि रासायनिक द्रव्यांच्या फावारनि द्वारा असंख्य जीव, जंतू ,प्राणी नष्ट पाऊस आल्या आल्या जमिनीवर आपला हक्क सांगत गवत व गाजर गवत उगवले .झाडांना पालवी व
फुले आली पण अजूनपर्यंत आला नाही तो बेडकांचा सामुहिक गोंगाट .रिमझिम बरसणाऱ्या पावसाळ्यातील
निसर्गचीत्राला सजीव करणार पार्श्वसंगीत देणारा हा सृष्टीचा कलाकार आहे तरी कुठे ?निसर्गाच्या जीवनचक्रातील
महत्वाचा घटक असलेला हा इवलासा जीव हरवला आहे .नामशेष होण्याच्या मार्गाला लागलेला तर नाही ?
केले जात आहेत.अशा विषारी द्रव्यांच्या वापरामुळे विषारी धान ,कडबा चारा खाउन कितीतरी प्राणी मरतात,
अश्या बातम्या नेहमीच असतात .हे सगळे प्राणी जीवजंतू निसर्गाच्या जीवनचक्रातील एक कडी आहेत याचे
संपूर्ण विस्मरण झाले ,असे दिसते .
गांवभर घाण साचू द्यायची .त्या घाणीच्या शेजारी जगायचं .आरोग्य्शास्त्रातले सगळे नियम धाब्यावर
बसवायचे ,मग आजाराची साथ आली कि सगळ्या जीव जंतू व प्राण्यांवर मानवी संक्रांत बरसणार .एक डास
मारण्याकरता ओतलेल्या विषारी द्रव्यांमुळे कितीतरी उपकारी जीव मारले जात आहेत याचे भान आम्हाला
नाही प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे बंद झालेल्या नाल्या ,तुडुंब भरलेली गटारे ,कचरा पेटीच्या सभोवताली साचलेली
घाण ,रस्त्याच्या कडेची अस्वच्छता .प्रत्येक वेळी फक्त प्रशासनालाच दोष द्यायचा काय ?
डासांना संपविण्याचे काम बेडूक ,गप्पी मासे यांना करू द्या .प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाचे अन्न आहे ,
त्यांचे काम त्यांनाच करू द्या .आपण फवारलेल्या विषारी द्रव्यांचे किती कण अन्नावाते आपल्या पोटात
जात असतील? एखादी कृती घडून गेल्यावर परिणामावर नियंत्रण कसे राहील ?मात्र प्रत्येक कृतीबाबत फेरविचार
होऊ शकतो .बुद्धीचा तोरा मिराविणार्यांनी निसर्ग रुपी ईश्वराकडे सुबुद्धीच वरदान मागावयास हवे .
सुहास सोहोनी [वर्तुळाचे टोक 2005]लेख संग्रह
No comments:
Post a Comment