Friday, June 2, 2017

�🙏🏼 शासनाने केवळ ,दारू विक्री पूर्ववत सुरु व्हावी एव्हढ्या कारणाने

💥🙏🏼 शासनाने केवळ ,दारू विक्री पूर्ववत सुरु व्हावी एव्हढ्या कारणाने राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग यांची मालकी स्थानिय स्वराज्य संस्था व महानगर पालिकेला कृपया सोपवू नये . *हा नैतिक मूल्यांचा प्रश्न असून अशा पळवाटां द्वारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची जाणीवपूर्वक अवहेलना होणार आहे .
*त्यापेक्षा शासनाने कोर्टाच्या निर्णयास सहमत राहून कायद्यास सहकार्य करावे हि सकारात्मक विचारसरणी असलेल्या नागरिकांची अपेक्षा आहे .
★कायद्याचे अत्यन्त कठोरपणे पालन व्हावे.★ ★सध्या जी दारू दुकाने गाव/शहरात सुरु आहेत त्यांना नगर पालिका,/महा नगर पालिका च्या हद्दीबाहेर, शासनाने एखाद्या ठिकाणी #जागा द्यावी म्हणजे गाव/शहरातील त्रास कमी होईल ,तेथेच #मांस विक्रेत्यांना पण जागा द्यावी,
★हा एक #पर्याय आहे ,आपली तक्रार असेल #तरच शासन विचार करेल .
★नागरिकांनी असे निवेदन आयुक्तांना द्यायला हवे.यासाठी लोकांनी प्रचंड संख्येने एकत्रित यायला हवे .#सह्यांसाठी.
★सध्या माझ्या घरासमोर हीच परिस्थिती आहे .
वेगवेगळ्या #संघटनांनी नागरिकांच्या सह्यानिशी एक
निवेदन #जिल्हाधिकारी#विभागीय #आयुक्त यांना द्यायला हवे.आपण आपले विचार शासनाला सांगण्याची गरज आहे.दारू दुकानां समोरील चित्र फारच भयावह आहे,

सुहास सोहोनी
9405349354 *संवेदना* ,
सामाजिक विचार मंच,
अमरावती .

No comments: