हा लेख दारू च्या व्यसनाच्या मगरमिठीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित◆
💥#मनोगत, : - एका दारूच्या आहारी गेलेल्या 'दारू ग्रस्ता'चे आणि त्याच्या परिवाराचे
💥
★#पत्नी
: - आमच्या लग्नाला १७ वर्षे झालीत,सुरवातीची २ वर्षे छान गेलीत.पहिली
मुलगी झाली.किती सुखी होते मी.हळूहळू दारूच्या व्यसनाचं असलेलं सत्य समोर
आलं .त्यातच आमच्यात एक सुंदर गोंडस बाळ आलं .मुलांना कसं सांभाळू हेच
समजेना.तरुणपणीची सगळी स्वप्नं जणूकाही हवेत विरून
गेली.रोज वादावादी,मुलांना मारणं,संशय,कितीतरी वेळा माझ्यावर हात सुद्धा
उचलला आहे.कां आलं हे जिणं माझ्या वाटेला ! रात्र रात्र मी फक्त रडून
काढल्या आहेत .पण अचानक घटना घडू लागल्या ,दारू मिळणे जिकिरीचं झालं,आता तर
परिसरातील सगळी दुकानं सील झालीत.१५ -२० दिवसांपासून दारू न मिळाल्याने
लडखडत चालणारा माझा नवरा जरा ताठ चालू लागला.बरं झालं ,आता "व्यसन सोडतो"
असं म्हणतोय,रोज सकाळी मॉर्निंग वॉक ला जातोय,संध्याकाळी आम्ही चौघे
बगिच्यात जातोय .मुळात चांगला असलेला माणूस चांगला वागतोय.हे इश्वरा
आम्हाला सुबुद्धी दे .हि दारूची दुकाने पुन्हा उघडू देऊ नयेत हीच सरकारला
कळकळीची विनंती.
★#मुलगी
: - मला माझे बाबा खूप आवडतात पण ते माझ्याशी कधी चांगल बोललेच
नाहीत.नेहमी मारझोड आणि आरडाओरडा.आमचं काय चुकतंय हेच मला कधी समजलं
नाही.आता मला व्यसनाबद्दल समजू लागलंय ,मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते कि
माझ्या बाबांना दारूच्या व्यसनातून मुक्त कर,आणि एक दिवस अचानक दारूची
दुकानं सील झाली आणि दारू सहज मिळेनाशी झाली ,काही दिवस बाबांना त्रास झाला
पण आता ते दारूला विसरले आहेत.आमच्याशी छान वागतात.फक्त एकच विनंती आहे की
हे देवा "हि बंद झालेली दारूची दुकानं पुन्हा उघडू देऊ नको"आम्हाला आमचे
बाबा हवे आहेत. ★#मुलगा : - माझे बाबा आणि आई मला खूप आवडतात.सगळे माझे खूप लाड करतात.
★ #मी : - काही प्रमाणात का होईना पण दारू बंदी एकदाची झाली ,माझ्या परिसरात आता सहज दारू मिळत नाही ,या आश्चर्यकारक व क्रांतिकारक बदलासाठी मी #जिल्हाधिकारी #साहेब व दारू चा विरोध करणाऱ्या सर्व सज्जनां चा मनःपूर्वक ऋणी आहे.मी दारूचे सगळे दुष्परिणाम भोगले आहेत - "#पण #आता #नाही".आता मी व्यसनापासून दूर जातोय,मी निश्चय केला आहे.मला बायको-मुलांकडे लक्ष द्यायचं आहे ,मुलांना खूप मोठं करायचं आहे.माझ्या शेती-व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आहे.माझ्या आई बाबांची काळजी घ्यायची आहे.मी आता फक्त सकारात्मकच विचार करतो.मी माझ्या परिवाराला खूप "आनंदी"ठेवणार आहे.हो आता मला समजले आहे की।
★ #आयुष्य #खूप #सुंदर #आहे★
*सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच,*
अमरावती -६
मोबा : - ९४०५३४९३५४

2 comments:
अप्रतीम, डॉक्टर साहेब! आपले ब्लॉग खूपच छान आहेत.
Chyan aahe
Post a Comment