Wednesday, April 6, 2016

बेरोजगारीचे दाहक वास्तव *

बेरोजगारीचे दाहक वास्तव *
बेरोजगारी हा एक मन अस्वस्थ करणारा विषय आहे .लहान मुले आणि वृद्ध यांना काम नाही ,त्यांची कारणे मान्य आहेत. स्त्रिया आपलंघर परिवार सांभाळतात त्यासाठी आयुष्यभर राबतात .भावी नागरिकांना लहानाचं मोठ करतात ,हेच त्या आपलं काम समजतात ,पण ज्यांच्या हातात काही काम नाही असा तरुण तरुणींचा शिक्षित वर्ग आज फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ,हे सत्य काबुल करावेच लागेल .जिथे तिथे हजारो च्या संख्येने तरुण वर्ग विविध परीक्षा देतात .भरती प्रक्रियेतून जातात ,त्यामानाने नोकऱ्या फार कमी आहेत ,त्यातही प्रत्यक्ष नोकरी देतांना दिली-घेतली जाणारी लाच ! किती किडलेली व्यवस्था आहे ही ? गरजवंत अतिशय लाचार असतो पण बाकीच्या बेरोजगारांचे काय ! प्रत्येक गावात असलेली ही बेरोजगारांची फौज, नक्की काय करते याच्याशी कुणालाही कर्तव्य नाही .प्रत्येकाच्या हाताला काम मिळालेच पाहिजे यासाठी प्रशासनातर्फे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा नाहीत ,जे आहेत त्यातील बरेच केवळ कागदावरच आहेत .
अफाट लोकसंख्येच्या समस्येमुळेच प्रत्येकाला रोजगार /नोकरी देणे प्रशासनाला अजिबात शक्य नाही .खाजगी उद्योग/व्यवसायात काही अंशी सोय होते पण कमी पगार असून अनिश्चितता असते .आधुनिक यंत्रांमुळे शेतीत बैल आणि मजुरांची संख्या कमी झाली ,पर्यायाने परंपरागत कुशल कारागीर सुद्धा काही प्रमाणात बेरोजगार झाले .कामाच्या आशेने शहरात आलेल्या मजुरांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली .प्रत्येक शहरातील बेरोजगारांची संख्या कित्येक पटीने वाढली कधीमधी मिळणाऱ्या कामापेक्षा रोजची जीवनशैली जास्त खर्चिक ठरते आहे .आत्यंतिक स्पर्धा ,चढाओढ ,असह्य भाव वाढीने व्यवसाय उद्योग व्याव्स्थापनांचे आर्थिक नियोजन पार कोलमडले .अनेक ठिकाणी नाईलाजाने सक्तीची कामगार कपात लादली गेली .सुरक्षिततेला तडा गेला .कुटुंबाच्या काळजीने मन सैर भैर होऊन रोजगाराच्या शोधात केवळ वणवण सुरु असलेली दिसते .रिकामे हात आणि उद्याची काळजी माणसाला योग्य अयोग्य ,सत्य असत्य ,नीती अनीती ही सतवचने विसरावयास भाग पडतात .जगण्यासाठी कित्येकवेळा नाईलाजाने शोर्टकटची निवड केली जाते .दुबळे मन असलेला आत्महत्येची वाट पकडतो तर कुणी गुन्हेगारीची साथ धरतो .कुटुंबातील स्त्रिया आणि मुलांना मात्र दुर्दैवाचे दशावताराचे भोग भोगावे लागतात .वर्तमानातील या दाहक वास्तवाला कसं सामोर जायचं बेरोजगारांनी !प्रत्येक जिल्ह्यात अगणित लघु उद्योगांचे जाळे उभारले जाऊन प्रत्येकाला रोजगार मिळून सन्मानाच जिण जगता यावे .
सुहास सोहोनी ,विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४४४६०६ ,
मोबा: ८६२६०६०६४६ ,९४०५३४९३५४

No comments: