पाण्यासाठी वाट्टेल ते |*👍
पाण्याची कमतरता ही या उन्हाळ्यातील प्रमुख समस्या असणार हे सांगायला कुणीही ज्योतीषी नको.नागरिकांनी पाणी कसे सांभाळून वापरावे हे सगळे एकमेकाला सांगताहेत,ठीक आहे पण कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवणे ही खरी गरज आहे ,हे मान्य व्हायला हवे.
*बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारे व पावसामुळे प्राप्त होणारे पिण्यायोग्य गोडे पाणी नदी नाल्यातून वाहत जाऊन शेवटी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मिसळते,त्यामुळे पिण्यायोग्य गोडे पाणी वाया जाते .हे जर समजते आहे तर *नद्या व पावसाचे पाणी पृथ्वीवर जागोजागी साठवायला हवे.*
*काही दिवस पाणी येणार नाही हे कळल्यावर आपण जसे घरातल्या प्रत्येक भांड्यात पाणी साठवतो ,तसे जमिनीचा उतार ,उंचसखल पणाचा अभ्यास करून, समजून घेऊन,प्रत्येक गावाजवळ तलाव निर्माण करायला हवेत.
* तलावभोवती मोठया वृक्षांची लागवड केल्यास आपोआप जंगलांची वाढ होऊन पर्यावरण संतुलन साधेल.
*पशुपक्षी जंगलातच सुखाने राहतील,शहरात येणार नाहीत,
*विहिरींना पाणी झिरपेल. *पाण्याविना जीवन अशक्य असल्यामुळे हा विषय आपल्या अस्तित्वाचा नाही का ?मग पावसाळ्यापूर्वी देशभर हा प्रकल्प सरकारी पातळीवर युद्धस्तरावर राबविण्याची गरज आहे .ही प्राथमिकता असायला हवी.
*मुख्य म्हणजे नागरिकांनी यात राजकारण आणू नये.*
*केंद्र व राज्य शासनांनी या कार्याला अग्रक्रम द्यावा.काही वर्षे सातत्याने प्रयत्न व्हावा.संबंधित अधिकारी व तज्ञ व्यक्तींनी कृपया पुढाकार घ्यावा व बिघडत जाणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करावे ही माझी कळकळीची विनंती आहे,
*वेळ कधीही गेलेली नसते,अजूनही वेळ आहे.
*शासनाने प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी 2 एकराचा तलाव अनिवार्य करावा.*
*असंख्य बेरोजगारांना काम मिळेल.
*हे सकारात्मक कार्य पुढील अनेक शतकांसाठी असणार आहे.
अन्यथा जनता *पाण्यासाठी वाट्टेल ते* करेल ही सार्थ भीती वाटते .
*सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती444606
मोबा:8626060646
*माझे विचार पटत असल्यास जरूर शेअर करावे.धन्यवाद.💐

No comments:
Post a Comment