Wednesday, June 17, 2015

* आमची उत्सवप्रियता आणि रस्त्यांची दुर्दशा *



==================================
* आमची उत्सवप्रियता आणि रस्त्यांची दुर्दशा *
                                        आम्ही स्वतःला उत्सवप्रिय म्हणवतो आणि कोणत्याही कार्य ,उत्सव प्रसंगी मंडप,कमानी लावण्याकरिता पहिला घाव रस्त्यांवरच घातला जातो .कार्य काहीही असले तरी शहरभर ठिकठिकाणी रस्त्यांवर शामियाने टाकले जातात ,रोषणाई केली जाते आणि काम संपले की रस्त्यावरचे गड्डे तसेच सोडून दिले जातात .ते विद्रूप झालेले ओकेबोके केविलवाणे रस्ते बघवत नाहीत .दिवसा आम्ही ते खाचखळगे सराईत पणे चुकवतो पण रात्रीच्या अंधारात आम्ही वाह्नांसकट त्यात उसळतो .
                   ज्याप्रमाणे सुदृढ माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ व निरोगी असतात त्याचप्रमाणे शहरातील रस्ते स्वच्छ व मजबूत असावेत .अवरुद्ध झालेल्या रक्तवाहिन्यांनी शरीराला गंभीर आजार होतो तसेच अयोग्य व विद्रूप रस्ते नागरिकांचे हाल हाल करतात .मनस्ताप ,चिडचिड ,सांधे,मणके,व कंबरेच्या दुखण्यांनी नागरिक त्रस्त होतात .
                   यावर उपाय काय ?प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या उत्सव समस्येचा विचार करावा .आजचे सुंदर रस्ते उसाव काळात विद्रूप होण्यापासून वाचवा .नागरिकांनी सुद्धा सकारात्मक विचार व कृती करून प्रसाशनाला सहकार्य करावे हि विनंती .
सुहास सोहोनी
*संवेदना*
[सामाजिक विचार मंच ]
विवेकानंद कॉलोनी,अमरावती.मोबा -९४०५३४९३५४

No comments: