संवेदना
(सामाजीक विचार मंच, अमरावती )
==================================
## रस्ते स्मार्ट तरच शहर स्मार्ट ##
एखाद शहर स्वच्छ , सुंदर आहे का ? हे ठरवायचे असेल तर त्या शहरातील रस्ते कसे आहेत ते आधी
बघावे लागेल . रस्त्यातील खाचखळगे गड्डे,फुटपाथ ,आजूबाजूच्या उघड्या
नाल्या ,गटार ,सर्विस लाईन,जोडरस्ते या सर्वांचा आढावा घ्यावा लागेल .याबरोबरच
स्पीड ब्रेकर च बांध काम फारच महत्वाच ठरत .स्पीड ब्रेकर्स कुठे ? कसे?
किती? आणि किती उंच असावेत याची विशिष्ठ संहिता आहे .जिथे आवश्यक तेथे नेमके स्पीड
ब्रेकर्स नसतात ,पण नको तेथे जास्त संख्येने असतील तर काय घडेल ?
अतिशय महत्वाचे म्हणजे
प्रत्येक स्पीडब्रेकर वर पिवळे पांढरे पट्टे असण अत्यंत महत्वाच आहे ,जेणेकरून
पुढे स्पीडब्रेकर आहे हे जाणवत आणि वाहनांची गती नियंत्रित करता येते,म्हणजेच अपघात
होण्याची शक्यता कमी होते.नियमापेक्षा जास्त उंच स्पीडब्रेकर असल्यास आजूबाजूने
वाहन नेण्याचा प्रयत्न होतो आणि धोका वाढतो.रंगीत पट्टे नसल्याने अचानक वाहन उसळते
,घसरते ,गंभीर अपघात होतात .कंबर पाठीचे दुखणे सुरु होते ,म्हणजेच चांगल्या
रस्त्यांवर योग्य स्पीडब्रेकर्स ला फारच महत्व आहे .
महानगर पालिका ,सार्वजनिक बांधकाम विभाग
,प्रादेशिक परिवहन विभाग च्या संबंधित अधिकार्यांना नम्र विनंती आहे कि मजबूत
रस्ते,स्पीड ब्रेकर्स,रंगीत पट्टे ,आणि झेब्रा क्रॉसिंग याकडे कृपया जातीने लक्ष
द्या .जर तृटी असतील तर कृपया लवकर दुरुस्ती करावी.शहरातील व शहराबाहेरील वाहतूक
सुसह्य करा .पिवळ्या पांढर्या पट्ट्यांमुळे आपोआपच वाहतूक नियंत्रित होईल ,अपघात
होणार नाहीत.कारण- रस्ते स्मार्ट तरच शहर स्मार्ट .
सुहास सोहोनी
[सामाजिक विचार मंच,अमरावती ]
विवेकानंद कॉलोनी,अमरावती.मोबा -९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment