सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज
ना होगा कोर्ट, ना मिलेगी तारीख और ना होगी सुनबाई. सिधा उपर भेज दूंगा । नायकाच्या तोंडी शोभुन दिसणारे टाळ्या हमखास मिळवणारा प्रेक्षकांच्या पसंतीचा हा डायलॉग नागपूरच्या आतंकाग्रस्त १०० -१५० च्या जमावाने भर कोर्टात पोलीस आणि वकीलाच्या साक्षीने एका कुख्यात गुन्हेगाराला यमसदनास पाठविले. तडीपार असलेला गुन्हेगार सतत मोहल्यात येतो. नित्य जबरी गुन्हे करतो. नागरीक आतंकित आहेत, त्रस्त आहेत. न्यायाची वाट न पाहता, पुर्ण विचार करून पुर्णनियोजित पद्धतीने त्या गुन्हेगाराला संपवले जाते. संपुर्ण पणे दोषी ठरलेल्या ज्ञात गुन्हेगाराला शिक्षा देण्याकरीता १०० च्या वर नागरीकांनी शस्त्र हाती धरावे ? ज्या पद्धतीने ही घटना घडली. त्या वेळी जास्त दु:खद घटना घडली आहे की १०० ते १५० नवीन गुन्हेगारांनी जन्म घेतला.
जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाचा न्यायपालीकेवर असीम विश्वास आहे. न्यायसंस्था ही सर्वोच्य आहे आणि ती आदरणीय राहिलीच पाहिजे, ही जबाबदारी आहे लोकशाहीचा पुरस्कार करणार्यांची निरनिराळी पद भूषवित मिरवणार्यांची. जनतेचे रक्षक असणारा पोलीस विभाग आणि शासनाचे सर्व घटक यांनी आपापली जबाबदारी वेळच्यावेळी पार पाडणे ही गोष्ट सर्वांच्या भल्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. दुष्टांच निर्दालन करण्यासाठी जनता जनार्दनाला कायदा हातात घ्यावा लागतोय हे संकेत निश्चीतच धोकादायक आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी कायद्याची कठोर पकड हवीच. कायदा आणि त्याचे रक्षक यांचा धाक कमी होत चालला आहे. ही गोष्ट अशा घटनांवरून सिद्ध होते आहे. कायदेशीर कार्यालयीन कामाला वेग देवून दोषी व्यक्तींवर लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याच्या त्रुटीचा लाभ जेव्हा सराईत गुन्हेगारांना मिळतो तेव्हा त्रस्त असलेल्या जनतेचा राग अनावर होतो ही मानसीकता लक्षात घेणे आवश्यक आहे. बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या, शिक्षित बेरोजगारांचा खदखदणारा असंतोष आणि भौतिक सुखाची लालसा यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ होईल यात नवल नाही. सुदृढ लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी न्यायदेवतेवर भारतीयांचा पुर्ण विश्वास हवा, यात तडजोड नाही करता येणार. जनसमुहाद्वारे केल्या गेलेल्या हिंसेच्या उद्रेकाच समर्थन होऊच शकत नाही. गरज आहे ती प्रस्थापित व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची. ( लेख संग्रह - वर्तुळाचे टोक - लेख क्रमांक २८ )
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
No comments:
Post a Comment