सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
मानवी हक्क म्हणजे कोणाही स्त्री पुरुषाचा शांततेने जीवन जगण्याचा अधिकार. या विचार मध्ये मानवता, मानवी भावना, मनुष्य आणि त्याचे मन अखिल मानवता वाद, मानवी अत्याचार, दबाव , जुलूम, असे असंख्य विषय अंतर्भूत असून मनुष्य जातीच्या सुखासाठी झटणे, गुन्हेगारांच्या वागणुकीत सिधार्ण घडवून आणणे , दुख : व क्लेश कमी करून मानव हित कसे वाढवता येईल, हा मानव हित वाद, व त्या अनुषंगाने मानवाधिकाराचे रक्षण कसे करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हे मानवी हक्क आयोगच कार्य आहे.
स्वार्थासाठी, सत्येसाठी मनुष्य व्यक्तिगत किंवा समूहाने इतर व्यक्ती किवा समूहाला, जरब दाखवून, जबरीने नाडतो, छळतो, अन्याय करतो किंवा निर्दयी होऊन हत्या करतो. कितीही सुसंस्कृतीच्या गप्पा मारल्या तरी जगभर नित्य या घटना घडतात. कुठलाही विधिनिषेध पाळला जात नाही. मानवी मुल्ये सहज गत्या पायदळी तुडवली जातात . शांततेने व सुखाने जगण्याचा हक्क नाकारला जातो. मानव स्वतः इतर मानवांचा शत्रू बनतो .प्रत्येक देशात मन गोठवणाऱ्या दुख:द दुर्दैवी घटना इतिहासात बद्ध झालेल्या आहेत. पण आपल्या देशात तरी कोणते वेगळे चित्र आहे ? शांततेने उपोषण करणाऱ्या, झोपेत असणार्यां, स्त्री , पुरुषांवर पोलीसी लाठीमार केला जातो, अश्रुधुराचा वापर होतो, स्त्रियांवर अत्याचार होतात, न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांवर, जमिनधार्कांवर, गोळीबार होतो. छोट्या मोठ्या गुन्हेगारांना अक्षरशः तुडविले जाते . अश्या कितीतरी घटनांचा उल्लेख करता येईल . शेतकऱ्यांवर, व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी विपरीत व्यवस्था निर्माण होऊ देणे हि कृती, परिस्थिती म्हणजे सुद्धा, मानवी हक्क पायदळी तुडवानेच आहे.
शांततेने व सुखाने जगण्याच्या मानवी मूल्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, व अत्याचार ग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयोग बनवणे व चौकशी करणे, नंतर मात्र सर्व प्रकरण थंड्या बस्त्यात वर्षानु वर्षे पडून राहणे हा अनुभव भारतीयांना नवीन नाही. जगण्याचा हक्क डावलल्या गेलेल्या केविलवाण्या अत्याचारग्रस्त व्यक्तिला मानविहक्कासाठी असलेला हा मंच म्हणजे एक आधार वाटायला हवा, आशेचा किरण वाटायला हवा. मात्र आज देशावर आतंकी हल्ला करुन, कराग्रुहात असलेले, फ़शीची शिक्षा झालेले आतंकवादी यांच्यासाठी मानवि हक्काच्या गोष्ठी देश सांभाळण्याची शपथ घेतलेले महानुभाव करतांना दिसतात. मानवी हक्कांचे रक्षण नेमक कोणाचे करायला हवे ? shahid झालेले, जखमी असलेले, वाचलेले, आणि सर्व नागरिक यांच्या मानवी मुल्ये व हक्कांच रक्षण होऊन त्यांना न्याय केव्हा मिळणार ? कारण फार उशिरा मिळालेला न्याय किंवा निर्णय हाच खरा अन्याय होय.
सुहास सोहोनी
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
No comments:
Post a Comment