Friday, April 5, 2019

एक यशस्वी लढा पाण्यासाठी

■ एक यशस्वी लढा - पाण्यासाठी■
           ★एप्रिल ते जून दाहक ऊन असणार ,
नाले ,नद्या आत्ताच कोरड्या पडल्या आहेत मानवा
सोबत पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. विहिरी,हँडपम्प कोरडे पडत चालले आहेत पाणी कसे मिळवावे,काय प्रयत्न करावा हीच चिंता जिकडे तिकडे जाणवते,तरीही पाणी हवे म्हणून अनेक ठिकाणी नवीन बोअरवेल खणल्या जात आहेत पर्यायाने जमिनीतील उरलेसुरले पाणी सुद्धा उपसले जाणार आहे हेही सत्य आहे .
           ★या परिस्थितीत  सुद्धा कुठूनतरी पाणी मिळवून,वापरून ते गटारात सोडले जाणार आहे.चित्र अगदी स्पष्ट आहे.पिण्यायोग्य पाणी वापरल्यानंतर गटारात सोडले की ते पाणी वाया जाणार,कुणाच्याही कामाचे राहणार नाही हे सत्य समजून घेण्याची गरज आहे.
            ★ कृपया सकारात्मक विचार करा वापरलेले पाणी नाल्यात, गटारात फेकू नका त्याऐवजी हे पाणी फिल्टर करून शोषखड्ड्याच्या माध्यमातून खोल जमिनीत साठवा,रिसायकल करा,असे केले तर दररोज करोडो लिटर पाणी जमिनीत साठेल ,आजूबाजूच्या विहीर बोअरवेल ला पाण्याची पातळी वाढेल ,जलसमस्या राहणार नाही .अवश्य विचार करा .

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान
मोबा : - 9405349354

2 comments:

Abhaysudhirgurjar said...

Sundar mahiti aahe

Unknown said...

khhup cchan mla pn bor punrbhrn krayche