Keep Fit Health Care
(Figure Control & Personal Fitness System)
Sohoni Complex, Vivekanand Colony, Amaravti.
Ph. 2567463, 9405349354
*नववर्षाचा संकल्प – उत्तम आरोग्य वर्ष २०१६*
वयाची पन्नाशी उलटली की अनेक जीवनावश्यक जबाबदाऱ्या सुरु
होतात. मुलांचे शिक्षण, लग्न, नोकरीतील बढती, बदली, कुणाचेतरी आजारपण, घराची
समस्या, स्वतःची कार, त्याचवेळी नातेवाईकांचे रुसवे फुगवे. अस बरच काही.मात्र या
गडबडीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अगदी थोडीसुद्धा फुरसत
नसते.पण, निसर्ग मात्र कधीही चुकत नाही.वयाप्रमाणे आरोग्याच्या तक्रारी अगदी
प्रत्येकाला सुरु होतात. जबाबदाऱ्या पाळणे आणि जास्तीत जास्त अर्थार्जन करणे ही तर
प्रत्येकाची गरज आहेच मात्र एक प्रश्न विचारावासा वाटतो की, आरोग्याविना अर्थार्जन,
कुणासाठी?
आपल्या दिनचर्येत कोणत्यातरी
व्यायाम प्रकाराचा लहानपणापासून समावेश असणे गरजेचे आहे .वरील प्रश्नाचे च उत्तर
आहे .निरोगी शरीरात सुखी मन असते .निरोगी असण्यासाठी *सुयोग्य पाचक आहार *सक्षम पाचन
संस्था *विनात्रासाचे मलमूत्र उत्सर्जन *बलप्राप्ती साठी अस्थी /सांधे व मांस
पेशींना पुष्ट करून सुयोग्य रक्त संचारासाठी प्रत्येक व्यक्ती परत्वे योग्य
व्यायाम *आणि *मनःशांती या पंचासुत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे .
चाळीशी नंतर विविध सांध्यांचे
विकार हळूहळू सुरु होत असतात .हे दुख्ह्दायक विकार केवळ ओषध किंवा तेल /लेप लाऊन
बरे होत नसतात तर योग्य वयात योग्य व्यायामाने नियंत्रणात राहू शकतात .म्हणूनच
म्हणावेसे वाटते –
**व्यायाम करा !!त्या विना पर्याय नाही**
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा माझा संकल्प आहे **उत्तम आरोग्य वर्ष -२०१६ **
माझ्या सोबत आपण सर्वांनी “उत्तम आरोग्याचा “संकल्प अवश्य करावा –आणि पाळावा
.डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडू नये –असेच वाटते ना ?
सुहास सोहोनी
Keep Fit Health Care
(Figure Control & Personal Fitness System)
Sohoni Complex, Vivekanand Colony, Amaravti.
Ph. 2567463,
9405349354
No comments:
Post a Comment