* सज्ञान होण्याकरीता वयाची
१८ वर्षे थांबावेच लागेल ना ? *
विविध संबंधित अधिकाऱ्यांशी केलेली
चर्चा आणि घडलेल्या घटना यावरून असे लक्षात आले की १६ वर्षापर्यंतच्या
मुलामुलींजवळ मोपेड किंवा मोटारसायकल आहे .वास्तविक “मोटार वेहिकल अक्ट १९८८
“प्रमाणे १६ वर्षावरील व्यक्तीला मोपेड [without gear ]व १०० सी. सी. पेक्षा कमी
असलेले वाहन चालवण्याची परवानगी आहे ,मात्र त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असलेच
पाहिजे हि अटआहे .
वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी व चर्चा
केल्यानंतर असे स्पष्ट झाले कि बहुतेक १६ वर्षाखालील मुलामुलींजवळ १०० ccपेक्षा
जास्त क्षमतेचे वाहन असून त्यांच्याजवळ driving lisence नाही .त्याचवेळी १६
वर्षावरील मुले व सुजाण,सज्ञान नागरिकांजवळ सुद्धा वाहन परवाना व वाहनाची विमा
पोलिसी नाही हे सत्य समोर आले .सार्वजनिक रस्त्यांचा वापर करतांना प्रत्येक वाहन
चालकाने रस्ता सुरक्षा [रोड सेफ्टी]चे नियम पाळणे स्वतःसाठी व इतरांसाठी
अत्यावश्यक आहे .
सर्व पालक व शिक्षण संस्थांना माझी
नम्र विनंती आहे कि आपल्या मुला मुलींशी या विषयी सकारात्मक चर्चा करावी .वाहन
क्षमता ,वाहन परवाना ,वयाची अट ,विमा पोलिसी,वेग मर्यादा या सर्व बाबींचे पालन
झाले तर अयोग्य, दुर्दैवी घटना टळतील व आपले कुटुंब व शहर सुरक्षित आहे असे म्हणता
येईल. एक सत्य मान्य करावाच लागेल कि ............
·
कायद्याने सज्ञान
होण्याकरीता वयाची १८ वर्षे थांबावेच लागेल ना ? *
सुहास सोहोनी
[निवृत्त विमा अधिकारी ]
सामाजिक
विचार मंच ,अमरावती
फोन
;२५६७४६३ मोबा .९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment