Sunday, December 23, 2012

* महिलांची सुरक्षितता आणि बालात्कार्यांना फाशीची कठोर शिक्षा हवी *

         *  महिलांची सुरक्षितता आणि बालात्कार्यांना फाशीची कठोर शिक्षा हवी *    दि .१७ डिसे .२०१२रोजी दिल्ली येथील बलात्कारा बाबतीत  संसद चालू असतांना सर्व नेत्यांनी  हृदय हेलावणारी भाषणे दिली अनेकांनी डोळ्यात पाणी आणून दाखवले भाषणे देण्याचे कर्तव्य बजावले .पण जर त्याचवेळी  या सर्व जबाबदार मंत्र्यांनी एकमुखाने एकयोग्य परिणामकारक कायदा पारित केला असता तर हा विषय चिघळला नसता .कायदा संशोधनासाठी विधेयक आणता आले असते आणि कायद्यात बदल करून कायदा अधिक सक्षम करता आला असता .पण नेमके तेव्हढे  केले नाही, त्यामुळेच जनतेचा रोष  देशभर रस्त्यावर उसळतो आहे .पोलिसी कारवाईकरून न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पाण्याचे फवारे ,अश्रू धूर ,लाठीचार्ज केला जात आहे .
            रस्त्यावर आंदोलन इतक्या दिवसांपासून सुरु असतांना सुद्धा शासनातर्फे कुणीही महत्वाची व्यक्ती
चर्चे साठी आली  नाही .सर्व मुलांना पोलिसी कारवाई च्या तोंडी ढकलण्यात आले. हे अयोग्य आहे ,दुर्दैवी आहे.
त्याचवेळी अनेक मोठे नेते,शासकीय अधिकारी यांच्यावर  बलात्काराचा   आरोप असून त्यांच्यावर केसेस
दाखल आहेत .त्यांचे काय होणार  ?
          नित्य खेड्यात ,शेतात, शहरात लहान मुली, तरुणी व कोणत्याही वयाच्या महिलांवर बलात्कार
झाल्याच्या बातम्या येतात .गुन्हेगारांना धडकी भरेल असा कायदा नाही हेच खरे आहे .वेळीच जनतेचा
रोष ओळखा आणि सक्षम कायदा तयार करा .
        * कधीतरी कायद्याने कठोर व्हायलाच हवे . *
         सुहास सोहोनी
        ९४०५३४९३५४
       www.mazyasamvedana.com

No comments: