Saturday, December 22, 2012

* कधीतरी कायद्याने कठोर व्हायलाच हवे . *

       कोणताही गुन्हा करतांना कायद्याच्या अंमलबजावणीची इतकी जबरदस्त धडकी गुन्हेगाराला असावी की त्याने भीतीपोटी गुन्हाच करू नये. बलात्कारा सारख्या जघन्य गुन्हेगारास  फाशीच द्यायला  हवी .
 त्याने खुनापेक्षाही घाणेरडा गुन्हा केलेला असतो .अगदी तालिबानी  पद्धतीने भर चौकात त्याचे अंग
 तोडण्याची शिक्षा  दिली गेली तरच गुन्हेगारांना धडकी भरेल .असलेल्या कायद्याची अंमलबजावणी
होत नाही, शिवाय न्याय होण्यास वेळ लागतो. फक्त ३ ते ७ वर्षांची शिक्षा होऊन गुन्हेगार मुक्त होतो .
तो पुन्हा गुन्हे करतो .पण त्या पिडीत महिलेचे काय ?
        संसद चालू असतांना सर्व नेत्यांनी हृदय हेलावणारी भाषणे दिली अनेकांनी डोळ्यात पाणी आणून दाखवले .भाषणे देण्याचे कर्तव्य बजावले .पण जर त्याचवेळी  या सर्व जबाबदार मंत्र्यांनी एकमुखाने एक
योग्य परिणामकारक कायदा पारित केला असता तर हा विषय चिघळला नसता .कायदा संशोधनासाठी
विधेयक आणता आले असते आणि कायद्यात बदल करून कायदा अधिक सक्षम करता आला असता .
पण नेमके तेव्हढे  केले नाही त्यामुळेच जनतेचा रोष  देशभर रस्त्यावर उसळतो आहे .पोलिसी कारवाई
करून न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पाण्याचे फवारे ,अश्रू धूर ,लाठीचार्ज केला जात आहे .
          नित्य खेड्यात ,शेतात, शहरात लहान मुली, तरुणी व कोणत्याही वयाच्या महिलांवर बलात्कार
झाल्याच्या बातम्या येतात .गुन्हेगारांना धडकी भरेल असा कायदा नाही हेच खरे आहे .वेळीच जनतेचा
रोष ओळखा आणि सक्षम कायदा तयार करा .
        * कधीतरी कायद्याने कठोर व्हायलाच हवे . *
         सुहास सोहोनी
        ९४०५३४९३५४
       www.mazyasamvedana.com

No comments: