*मधुमेहींना लाभदायक आरोग्याची चतुःसूत्री *
आपण कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असो किंवा नसो पण आपण भारतीय ,"मधुमेह "या विषयात वर्ल्ड चम्पिअन आहोत हे दुर्दैवाने सत्य आहे .आगदी सात आठ जणांपैकी एक जण मधुमेही असतोच .काही मधुमेही ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत ,एवढेच .मात्र हे प्रमाण निश्चितच गंभीर आहे आणि चिंता करण्याजोगे आहे .वयाच्या २५ ते ३० पर्यंत प्रकृती सक्षम असली तरीही त्यापुढे ४५ ते ५० च्या वयात क्षमता खालावते व अनुवांशिक मधुमेहाचा धोका सुरु होतो .संधी मिळताच रक्तातील साखरेची स्तिथी बिघडते .
बहुतेक वेळा परीक्षणा अभावी रोगी अज्ञानात राहतो आणि नेमके हेच प्रमाण अत्याधिक आहे .बालवयात
मधुमेह असण्याचे प्रमाण सुद्धा फार आहे .हा टाईप -१जुव्हेनैल या नावाने ओळखला जातो .जेव्हा शरीरातील
स्वादुपिंड जरासुद्धा इन्सुलिन निर्माण करीत नाही ,तेव्हा हा मधुमेह होतो .या मुलांचा इन्सुलिन चा खर्च फार
असतो .व्यक्ती प्रमाणे खर्च कमी जास्त असतो तरी अंदाजे २ ते ३ हजार रुपये महिना खर्च होतो .मध्यम वर्गीयांना या खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज असते सामाजिक संस्थांनी या लहान मुलांना सांभाळण्याची
गरज जाणवते .
टाइप -२ मधुमेह हा इन्सुलिन , इंजेक्शन ,गोळ्या ,व्यायाम अश्या योग्य त्या उपायाने काबूत ठेवता येतो .प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी ,सहज नसली तरी मधुमेहाची सर्वांगीण माहिती ,पत्थ्य आणि अथक परिश्रमाने रक्तातील साखर" नॉर्मल " ठेवण्याचा प्रयत्न करता येतो आणि त्यात यश नक्की मिळते इन्सुलिन , इंजेक्शन ,गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी जास्त करणे योग्य आहेच पणआहार, विहार,योग्याभ्यास [व्यायाम ]आणि मनःशांती ही आरोग्याची चतुःसूत्री प्रत्येकाने अवगत करून त्याप्रमाणे
जीवन शैली घडवणे आवश्यक आहे आणि लाभदायक आहे .कितीतरी मधुमेहींनी ही चतुःसूत्री आचरणात
आणल्याने त्यांच्या गोळ्या वा इन्सुलिन चा डोस कमी झाला आहे .
[१]आहार -योग्य ताजे आणि पाचक आहाराचं फार महत्व असून आपले जेवण दिवसभरात विभागून घ्यायला हवे .आहारातील पदार्थांचे केलारी संदर्भात" मेनेजमेंट "सांभाळले तर मधुमेही सर्वच आवडीच्या
पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो ,अगदी पेढा व आंबा सुद्धा .संयमित आहाराने रक्तशर्करा संतुलित ठेवता
येते .
[२]विहार -सकाळच्या आल्हाददायक वेळी कमीत कमी ४५ मिनिटे दररोज जलद चालणे आवश्यक आहे .
प्रकृतीनुरूप चालण्याचा वेग, वेळ सांभाळावा .चालतांना श्वास ,नाडिचे ठोके ,छातीची धडधड यावर मन
एकाग्र करावे .दर दहा मिनिटांनी थोडे थांबावे .शक्य तोवर एखादा मित्र सोबती असावा किंवा ग्रुप असल्यास
उत्तम .
[ ३ ]योगाभ्यास - [व्यायाम ]ही एक वैशिष्टपूर्ण वेगळी जीवनशैली असून अष्टांग योगाची जास्तीत जास्त तत्वे अंगीकारणे नक्कीच लाभदायक आहे .यम, नियम ,शौच ,शुचिता ,सत्य ,अस्तेय ,चोरी न करणे
,व्यसनांपासून दूर राहणे अशा अनेक गोष्टींचे पालन व्हावे ,त्यानंतर हलका व्यायाम [प्रत्येकाला झेपेल असा ]
दररोज करणे आवश्यक आहे .
[४] मनःशांती - गृहस्थ आश्रमात राहून मनःशांती टिकवणे ही तारेवरची कसरत असली तरी मधुमेह
नियंत्रणात ठेवण्यास मन शांत ठेवणे गरजेचे आहे .मानःशांन्ति कुणालाही मागून मिळत नाही पण आपल्या जीवन शैलीवर बरेच काही अवलंबून आहे .
आरोग्यासाठी या चातुह्सुत्रीचा स्वीकार केल्यास रक्तातील साखर ,रक्तदाब ,चरबी अशा अनेक गोष्टी
नियंत्रणात येतात व पर्यायाने आरोग्य सुधरते ,म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे
आरोग्याची चतुःसूत्री .
सुहास सोहोनी ---९४०५३४९३५४
सहसचिव ,डायबेटिक असोसिएशन ,अमरावती .
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment