Wednesday, October 17, 2012

‎* आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी *

‎* आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी *

लहानपणी वयवर्ष १५ पर्यंत भरपूर हालचाल आणि खेळ यामुळे शरीर व्यवस्थित असते, म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने करोडपती असते, मात्र पुढे आयुष्यभर तसेच राहील कि नाही हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. बैठी जीवन पद्धत्ती अळस व्यायामाचा अभाव अबर चबर खाणे या मुले वाढलेले वजन, शरीराचा मोठा घेर आणि तरीही शरीर बिचारे विनातक्रार वयाच्या ४० - ४५ वर्ष पर्यंत काम करताच असते. आर्थिक साम्पातीत भर पडत असते, भौतिक सुखाची चटक वाढलेली असते, नंतर मात्र शरीराचा मेनटेनन्स खर्च सुरु होतो. पावलान पासून डोक्या पर्यंत सगळे अवयव दुखू लागतात. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत ही व्यक्ती करोडपतीची लखपती बनलेली असते. मग सुरु होतात डॉक्टरांकडे वाऱ्या. कुणीतरी सांगितले म्हणून प्याथी बदलवून नव नवे उपचार सुरु होतात. आधी गावातले हॉस्पिटल, मग मोठ्या शहरातले मोठे हॉस्पिटल. पुढे काय ? सुज्ञास सांगणे न लागे ! घरात भिंतीवर फ्रेम मध्ये हक्काची जागा .
                       जस जशी आर्थिक संपत्तीत वाढ होते आणि भौतिक सुखाच्या पूर्ण आहारी माणूस जातो तेव्हा अधिक संपत्ती,
मग अधिक सुख या दीर्घ चक्रव्युहात तो गरा गरा फिरत राहतो. त्याची सुटकाच होत नाही. कुटुंबाच्या महागड्या मागण्या त्याला पूर्ण करावयाच लागतात त्यासाठी अर्थार्जन आणि फक्त अधिक अर्थार्जन एवढेच करणे क्रमप्राप्त ठरते. नीती नियमांचे बान्ध त्याला थोपवू शकत नाहीत. त्याच्या मालकीच्या आणि उपयोगाच्या प्रत्येक वस्तूंची तो उत्तम काळजी घेतो. संगणक, कार, स्कूटर, फ्रीज यांची तो तत्परतेने दुरुस्ती करतो. या तत्पर्तेबद्दल नेहमी अभिमानाने सगळ्यांना सागतो. मात्र सतःच्या शरीराची वर्तमान स्थिती समजून घ्यायला नकळत विसरतो. आरश्यान न मावणार स्वतःच शरीर पाहून सुखावतो. पण याच वेळी आरोग्याच्या बाबतीत लाखपतीचा दरिद्री झालेला असतो. सगळ्यात दुर्दैवी बाब अशी कि, अफाट मिळवलेली संपत्ती सुद्धा जीव आहे तोवर जगवा, म्हणून खर्च करावी लागते.
                            स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून केलेलं अर्थार्जन खरच काय कामाचं. कुणासाठी केलं हे अर्थार्जन ? मुलांसाठी. विनामेहनत मिळालेली संपत्ती, मुलं टिकवतील कि उधळतील ?मग ! डॉक्टर मंडळी मात्र नक्कीच श्रीमंत होतात. प्याथ्यालॉजी ल्याब, केमिस्ट, सगळ्यांना चं धंदा मिळतो. पण आपल काय ? लहानपणी मिळालेल्या करोडपती शरीराला आपण आपल्याच कर्माने आरोग्याच्या दारिद्र्य रेषेकडे घेऊन जातो. आरोग्याची संपत्ती नष्ट होण्या आधी मधेच कुठे तरी थांबायला हवे. आरशात बाह्य शरीर बघतांनाच शरीराच्या आत डोकावून पाहायला हवे. काही दुरुस्त्या, सुधारणा, जीवनशैलीत बदल साधायला हवा. सुधृढ आरोग्याच्या लाभासाठी चतुःसुत्रीचे आचरण स्वीकारावयास हवे. ही लाख मोलाची चतुः सूत्री म्हणजेच १. आहार, २. विहार, ३. योगाभ्यास (व्यायाम), ४. मनः शांती. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली व शरीरावर प्रेम केले तर पुन्हा लखपती आरोग्यवान होता येते. तेव्हा आरोग्याविना अर्थार्जन कुणासाठी ?

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

No comments: