अहिंसेवर बोलू काही
योगसाधनेचा अभ्यास करताना योगाच्या आठ अंगांचा अभ्यास सुचवला आहे. त्या अष्टांग योगात प्रथम यम म्हणजे निग्रह - संयम, यात पाच यमापैकी एक आहे "अहिंसा' आपल्या कृतीने उक्तीने मनाने किंवा नजरेने कोणत्याही प्राणिमात्राला उपद्रव होणार नाही असे वागणे म्हणजे अहिंसा. क्रोधाचे दृश्य स्वरूप, घडणारी कृती, म्हणजे हिंसा. अहिंसा हा धर्म आहे, सुसंस्कार आहे. सजीवांच्या या सृष्टीत मांसभक्षी प्राणी आहेत, तो निसर्गचक्राचा भाग आहे. त्यांचे वेगळे पण त्यांच्या जबड्या त असलेल्या सुळ्या मध्ये आहे. मांसभक्षी प्राणी जीभेने आवाज करीत पाणी पितातत परंतु तृणभक्षी प्राणी आणि मानव यांना सुळे नाहीत आणि ते ओठांनी पाणी पितात. म्हणजेच उदरभरणासाठी मानवाजवळ इतर पर्याय आहेत. तरीही मानव इतर प्राण्याची हिंसा करतो, एवढेच नाही तर मानव स्वप्रजाती आणि स्वकियांची सुद्धा निघृण हिंसा करतो.
पुरातन काळा पासून संपुर्ण विश्वात योगसाधना, अहिंसा व शाकाहाराचा पुरस्कार करणारं भारत हे एकमेव राष्ट्र आहे. सुदैवाने या मुळ भारतीय जीवनप्रणाली चा प्रसार, विचार व आग्रह आज भारताबाहेर धरला जात आहे. अहिंसा हे तत्व एकटे नसून ते अष्टांग योगाच्या पेकेज मधील एक जगण्याचं तत्व आहे. समृद्ध भारतीय जीवनशैली जगावयाची असेल तर अहिंसेसोबत सत्य, चोरी न करणे, मोह नसणे, विकारांवर ताबा, शुचित्व , संतोष, तप, आराधना त्याचबरोबर स्वास्थ्य वृद्धी व अंतर्मुख बनणे या तत्वांचा सुद्धा स्विकार, अभ्यास व प्रसार करणे आवश्यक आहे. हरणाजवळ जशी सुगंधी दिव्य कस्तुरी असते तसा भारतीयांजवळ सुखी जीवनाचा हा अनमोल खजीना खचाखच भरलेला आहे. संपूर्ण विश्वाला समृद्ध आणि विचारांनी श्रीमंत करण्याचं सामर्थ्य या भारतीय वैचारिक खजीन्यात आहे.
अहिंसेचा एखादा दिवस साजरा करावा असे जर वाटत असेल तर 364 दिवसांच काय? ज्या तत्वाचा आजीवन स्विकार करावयास हवे त्या बाबत सरकारी खाक्याप्रमाणे एकदिवसीय विचार करायचा? खरोखर सुखी जीवनाचा ध्यास असणाऱ्या प्रत्येक भारतीयाने आत्मचिंतन करावयालाच हवे. आपण जे खातो त्यानुसार आपला स्वभाव बनतो. तामसी स्वभाव हिंसेला प्रवृत्त करतो. हिंसा कधीही एकटी नसते तर सोबतीला असतो अविवेक आणि क्रौर्य. अविचाराने हिंसेचा मार्ग धरणारे समाजाला दु:ख, यातना देत असतात पण त्यांचा शेवटसुद्धा हिंसेनेच होतो, शिवाय आप्तजनांची नाचक्की होते. हिंसेने काहीच साध्य होत नसतं. जर काही उत्पन्न होत असेल तर ती म्हणजे "प्रतिहिंसा'. जगभर हिंसक घटनांच तांडव चालू असताना अहिंसेचा आग्रह धरलाच पाहिजे. जास्तीतजास्त प्रमाणात सर्व समाजघटकांना अहिंसेच्या राजमार्गावर सन्मानाने चालण्याची शिकवण दिली जाण्याची गरज आहेच. माणसांनी एकमेकाचा आदर करावा, कुठेही आतंक नसावा असे दिवस पाहण्यासाठी चला मित्रांनो "अहिंसेवर बोलू काही'.
ुुु सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment