Tuesday, June 14, 2011

एका लेखणीला विरगती

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_____________________________________________________

एका लेखणीला विरगती

पत्रकारांवरील हल्ले हि दुर्दैवी घट्ना असून एक चिंतेचा विषय आहे. एखाद्या समस्येचा मागोवा घेणे हा पत्रकाराच्या कामाचा एक भाग आहे. त्यातल्या त्यात गुन्हेगारांच्या मागावर राहून त्यांच्या बातम्या मिळवणे ही गुन्हेजगताविरोधात सुरु असलेली एक लढाइच आहे. या लढाइत पत्रकाराच्या हातात लेखणी असते तर गुन्हेगारांच्या हातात शस्त्र असते. कुठ्लीही मान्यताप्राप्त वर्दी नसलेला, शत्राचा वापर न करु शकणारा, माहिती गोळा करुन लेखणी द्वारे, माध्यमाद्वारे ती उघडकीला आणण्यासाठी प्रसंगी जीव पणाला लावून धड्पड्णारा, एखाद्या मिडीया समुहाचा पगारी नोकर असलेल्या या शोध पत्रकाराला काय संरक्षण असते ?

शोधपत्रकारीतेत मुळात पत्रकाराचे काम हे नेहमीच गुप्त स्वरुपाचे असते. कुणावर विसंबुन राहायचे, कुणाकडून माहिती घ्यायची हा सगळा बुद्धीचा आणि डावपेचांचा खेळ असतो, मात्र त्याचवेळी गुन्हेजगताचे जाळे (नेटवर्क) खुपच मजबुत असुन त्यांच्या जवळ अद्ययावत शस्त्रास्त्रे, वाहने, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे असे उघडकीस येत असते. विरोध न आवड्णाऱ्या आणि जिवावर उदार असणाऱ्या या माफियांनी कुणाचीही हत्या करणे अगदी सहज गोष्ट आहे. समाज विघातक कारवायांद्वारे गडगंज संपत्ती लुट्णारे भुमाफिया, तेल माफिया, अन्न धान्य, ऒषधी, मानव तस्करी, बनावट नोटा, अवैध शस्त्र ख्ररेदि विक्री, बोगस गुंतवणुकवाले, आणि अश्या कितीतरी प्रकारे गुन्हे करणाऱ्या माफिया मंड्ळींना अड्थळे कसे काय सहन होणार ?

"मिड डे" चे इंन्हेस्टीगेटींग एडीटर असलेले जोतिर्मय डे यांची हत्या विचार करण्यास प्रवृत्त करते. आज पर्यंत जगात अनेक पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत, हत्या झालेल्या आहेत. हे सर्व पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतांना बळी गेलेले आहेत. पत्रकारांना संरक्षण देण्याची गरज आहे. गोपनीय कामात व्यग्र असतांना संरक्षण कसे आणि केव्हा द्यायचे, असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा अनुभवांती काही ठोस संरक्षणात्मक व्यवस्था निर्माण करावयास हवी. गुन्हेगारांविरोधात लढ्णारा पत्रकार हा मिडीया व समाजासाठी मौल्यवान जीव आहे. कर्तव्य पार पाड्त असतांना जीवाचे बलीदान करणाऱ्या पत्रकारांना विरगती प्राप्त झाली असे म्हणावयास हवे. यांचा मरणोत्तर उचित सन्मान व्हावा व त्यांच्या परिवाराला आर्थिक संरक्षण मिळावे.

सुहास सोहोनी
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन, अमरावती
मोबाइल: ९४०५३४९३५४
फोन : ०७२१-२५६७४६३


No comments: