* वीजटंचाईला उत्तर –सौर उर्जा उद्योग ,पण
केंव्हा ?*
सौर उर्जेचा उपयोग आपण मुळीच करत नाही. उर्जेचा
प्रखर स्त्रोत डोक्यावर तळपत असतांना सौर उर्जेचा वापर का नाही होत ? ही उर्जा
शाश्वत ,अनंत आहे ,अविनाशी आहे तरीही दैनंदिन कार्यासाठी हि उर्जा आपण वापरत नाही
.आपण भूगर्भातील कोळसा, पाणी, पेट्रोल ,वायू किती नष्ट करणार? काही क्रांतिकारक
बदल होण्याची गरज आहे .हा प्रकल्प आत्यंतिक महाग असला तरी त्यात देश हित आहे व
देशाच्या विकासा हेतू अत्यावश्यक आहे .तल्लख बुद्धीमत्तेचे आमचे शास्त्रज्ञ,प्रदूषण
मुक्त इंधन देणाऱ्या व सहस्त्र दिशांनी अविरत झिरपणार्या या सूर्य किरणांना आपल्या
ओंजळीत बंदिस्त नक्कीच करतील .
विजेचा वापर हा मुख्यत्वे १] घरगुती २]
उद्योग,व्यवसाय ३]शेती ४]पथदिवे ह्या चार प्रकारे होत असतो.यापैकी उद्योग व्यवसाय व शेती
यांना प्राधान्य द्यायला हवे,यात दुमत नसावे.प्रत्येक शहरातील व जिल्ह्यातील
पथदिवे संपूर्णपणे सौर उर्जेवर कटाक्षाने चालवावे .यासाठी जिल्हावार सौर उर्जा
केंद्र उभारायला हवे .या पद्धतीत संशोधन व उद्योगाला भरपूर वाव आहे .वाचलेली वीज शेती व उद्योगाकडे वळवता येईल .कधीही खंडित न होणारी वीज आम्हाला मिळावी अशी रास्त
मागणी ग्राहकांची असणे साहजिकच आहे .नवीन बहुमजली बांधकामांच्या वेळीच सौर्य उर्जा
संयंत्र बसवण्याची अट असावी .कर्ज उपलब्ध आहेच .
शासनाच्या कागदावर असणाऱ्या विविध योजना
कार्यान्वित व्हाव्यात .गरज आहे योग्य संशोधनाची ,सकारात्मक खंबीर प्रयत्नांची
.सौर उर्जा उद्योगात रोजगाराची फार मोठी संधी आहे .हा उद्योग देशासाठी क्रांती
पर्व ठरू शकतो .शासन आणि जनतेची मानसिकता बदलण्याची गरज आहे .केवळ राजकारण करून
पक्षीय स्वार्थ पदरी पाडून घेण्यापेक्षा काही राष्ट्रीय कार्य दीर्घ मुदतीसाठी
करण्याची आवश्यकता असते ,ज्यात देशाचे भले व्हावे.
सुहास सोहोनी
लेख संग्रह –उजळते
क्षितिज[२००७ ]मोबा -९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment