# मैत्री कट्टा #
आजूबाजूला संतत काही चांगल्या वाईट घटना घडतच असतात ,अगदी आपल्या बाबतीतही विविध घटना घडत असतात ऽअपल्यल मिळालेलं हे आयुष्याच देण जगतांना सुसह्य व्हावं ,सुरक्षित असावं ,यशस्वी जगावं असंच प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही .परिपूर्ण सुखी आयुष्य म्हणजे नक्की काय ?काय करावे म्हणजे आपण व आपला परिवार निश्चिंत राहू ?अशा विविध विचारांनी सामान्य व्यक्ती त्रस्त असते .
विविध उत्तरोत्तर भेडसावणाऱ्या समस्या अचानक उद्भवणारे अनारोग्य ,मधुमेह , कुणालातरी असणारं अपंगत्व ,शिक्षणासाठी नेमके कोणते विषय निवडावे ?कोणती दिशा धरावी ?नोकरी मिळवण्याची चिंता ,व्यवसाय टिकवण्याची चिंता ,यासाठी सतत योग्य प्रयत्न करण्याची गरज . विवाह समस्या ,नाते संबंधातील ताण तणाव ,द्विधा मनस्थिती ,भविष्याची हुरहूर ,वाढत्या वयाची सुप्त चिंता ,बर्याच बाबतीत योग्य निर्णयाचा अभाव ऽश अनेक समस्यांबाबत कुणाशीतरी बोलायचं असतं . आपल्या मनातील विचार
कुठेतरी व्यक्त करावेत असं वाटत ,हे खरे आहे .
अशा वेळी हवा असतो एक" जिव्हाळ्याचा मित्र "जो आपलं बोलणं ,आपली समस्या समजून घेईल व आपल्याला सकारात्मक प्रोत्साहन देईल . अशी मैत्रीयुक्त वातावरणातील जागा म्हणजेच" कट्टा "जो
आपल्याला हवा असतो . खरंय ना ?
या "मैत्री कट्ट्या "पर्यंत किती जण पोहोचतात हाच प्रश्न आहे. स्वगत आहे .
सुहास सोहोनी
सोहोनी कॉम्प्लेक्स विवेकानंद कॉलोनी ,
अमरावती ४४४६०६
फोन ०७२१-२५६७४६३, मोबाईल -९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment