* या वर्षी पण दिवाळी आली ..............*
या वर्षी पण दिवाळी आली ,गेल्यावर्षी आली होती तशीच .स्वेटर,शाली,रजया ,कपाटातून निघाल्याच नाहीत ,कारण थंडीच नव्हती .सर्व भाज्या ,धान्य ,तेल,तूप,गेस सिलेंडर महाग झाले पण टीव्ही ,फ्रीज ,कार ,संगणक यांच्या किमती मात्र कमी झाल्यात ,शिवाय त्यावर भेटवस्तू पण मिळाल्यात .देशाचा विकास दर वाढला असे सांगितले जाते पण कितीतरी गरिबांना ही गोष्ट माहितीच नव्हती देशात अब्जाधीशांची संख्या यावर्षी पण वाढली.तितकीच गरिबांची संख्या सुद्धा वाढली .परदेशी गुंतवणूक दारांनी यावर्षी जास्त गुंतवणूक केली ,त्यामुळे आपले राष्ट्र श्रीमंत झाले ,असे गरिबांना वाटू लागले .खूप धान्य आयात झाले,गोदामात अतोनात धान्य सडले ,कुपोषणाचे प्रमाण सुद्धा वाढलं ,यावर्शी पण हजारोंनी कुपोषित बालके दगावली .मोठी आंदोलने झाली ,जनजागृती होता होता त्यांच्यातच आपसात फुटही पडली .
करोडो रुपयांचा फटाक्याचा धूर आकाशात उडाला .मागच्या वर्षीच्या धुरांत मिसळला .जागतिक तापमानात थोडी वाढ हे खरे असले तरी मुलांना फटाक्याची मजा आली .मात्र नक्षलवाद्यांनी दरवर्षी प्रमाणे खरोखरीची स्फोटके उडवून अनेक पोलीस व नागरिकांना शहीद केले .मुलांनी घरोघरी मातीचे किल्ले केले ,पण सुतळी बॉम्बने उडवले .हा मुलांचा खेळ होता .बाजारात तयार फराळाचे पदार्थ मिळत असल्याने काही गृहिणींना हायसे वाटले ,पण बऱ्याच घरांत यावर्षीही फराळाचे पदार्थ बनले .फराळ करता करता महागाई कां झाली ?कुणामुळे झाली ?यावर घरोघरी चर्चा झाली ,गेल्यावर्षी सारखीच .मिठाई ची विक्री झाली पण त्यापेक्षा जास्त मद्य विक्री झाली .मद्यपिंन्ची संख्या वाढून महसूल शुल्क भरपूर मिळाले .वाईनरी उद्योग भरभराटीला यायला हवा ,यासाठी तज्ञाची एक समिती गठीत झाली आहे असे कळलंय .यावर्षी सुद्धा टीव्ही वाल्यांनी खूप मनोरंजन केले .श्रीमंतांच्या सासू सुनांची खलनायकी ,खुनशी भांडणे दाखवली .,फराळाचे पदार्थ बनवले व खाऊन दाखवले. आम्ही प्रेक्षकांनी तृप्त होऊन बघितले .
प्रत्येक गावांत यावर्षी भिकाऱ्याचे प्रमाण वाढले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडाही वाढला .ही गोष्ट जबाबदार नागरिकांनी एकमेकाला फराळ करता करता सांगितली,आणि या विषयावर घरा घरांत सखोल चर्चा (च ) झाली .अनेक कवी मंडळींनी विनोदी कविता करून पाहिल्या.काही लोकांना मात्र मुळीच हसता येत नाही असा निष्कर्ष निघाला .यावर्षी सुद्धा पुढारी व अधिकारी वर्गाची दिवाळी छान झाली . घोटाळ्यांचे फटाके फार जास्त फुटले .पण नुसतेच आवाज झाले .खाजगी प्रवासी बसेसनी यावर्षी पण भाववाढ केली .जमेल तसे लुटले .पालकांनी मुलांसाठी अभिमानाने परदेशी बनावटीची खेळणी आणली.मुले आनंदली,मात्र विदेशी उद्योगांची भरभराट झाली .यावर्षीसुद्धा दिवाळीपूर्वी आतंकवादी आणि शेजारी देशांची भीती दाखवली गेली .हळव्या मनाच्या समाजसेवकांनी नेहमीप्रमाणे अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन दिवाळी साजरी केली ;पण परदेशात स्थाईक झालेल्या मुले,सुना,नातवंडांची आठवण काढत कित्येक आई बापांनी यावर्षी सुद्धा दिवाळी साजरी केली ,गेल्या वर्षा सारखीच.
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
www.suhassohoni.blogspot.com
facebook/mazyasamvedana

No comments:
Post a Comment