Monday, April 9, 2012

विश्व पुस्तक दिनी सुहास सोहोनी लिखित क्षण वेचताना या लेख संग्रहाचे विमोचन

प्रती, 
      मा. संपादक,
      -------------------------------

      -------------------------------

विश्व पुस्तक दिनी सुहास सोहोनी लिखित क्षण वेचताना या लेख संग्रहाचे विमोचन

नागपूर येथे महाराष्ट्र वृतपत्र लेखक असोसीएशन द्वारे संपन्न झालेल्या शब्द साहित्य संमेलनात विश्व पुस्तक दिनी दिनांक ०५/ एप्रिल / २०१२ रोजी सुहास सोहोनी लिखित क्षण वेचताना या लेख संग्रहाचे विमोचन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गिरीश गांधी, विश्वस्त वनराई, यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलन उद्घाटक, श्री वसंत आबाजी डहाके, संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. राजदत्त, स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध सेलेब्रिटी  शेफ श्री विष्णू मनोहर, गझल नवाज श्री भीमराव पांचाळे, कुलगुरू नागपूर विद्यापीठ डॉ. विलास सपकाळ, अध्यक्ष पत्रकार समिती श्री रणजीत बाबू देशमुख, अध्यक्ष गुरुदेव सेवाश्रम नागपूर श्री बाबासाहेब पत्राले,  महाराष्ट्र वृतपत्र लेखक असोसीएशन चे सचिव श्री प्रभाकर वानखेडे, आणि निमंत्रक श्री प्रा.ज्ञानेश वाकुडकर हे उपस्थित होते.

        सुहास सोहोनी यांचे क्षण वेचतांना हे पुस्तक म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रातून लिहिलेल्या विविध स्तंभ लेखांचा संग्रह आहे. इंटरनेट वर फेसबुक तसेच www.suhassohoni.blogpot.com  या  वेब पेज वर हे साहित्य व पुस्तक विमोचानाची व्हीडिओ चित्रफीत जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध असून त्यांची आजपर्यंत वर्तुळाचे टोक, व उजळते क्षितीज ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 


प्रभाकर वानखेडे, सचिव,

महाराष्ट्र वृतपत्र लेखक असोसीएशन,
फोन : ९८६०२५१३६८.
 

No comments: