सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
अशीही एक लढाई पाण्यासाठी वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
आपल्या सूर्यमालेतल्या ज्या ग्रहांवर पाणी उपलब्ध नाही तेथे जीवसृष्टी आहे का ? आपल्या पृथ्वीवर जेथे आज वालवंत आहे अश्या ठिकाणी सुद्धा जीवन थांबलेले आहे. ज्यांना शक्य झाले त्यांनी स्तलंतर केले व जेथे पाणी आहे तेथे वस्ती केली. पाणी या दोन अक्षरी शब्दांमध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे आपण नेहेमी पाहत आलो आहोत. पाण्याच्या थेम्बाने जीवन दान मिळते. शांत शुद्ध जलाशयामध्ये कितीतरी जीव संस्कृती कालक्रमण करतात तर त्याच पाण्याच्या अनिर्बंध वेगवान प्रवाहामुळे जीवसंस्कृतीचा नाश होत आला आहे, हे काही नवीन नाही. हि निसर्ग लीला आहे. पृथ्वी वरील उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठया पैकी पिण्या योग्य गोड्या पाण्याचा साठा कमी होत आहे. हे खरे आहे. पाऊस लहरी झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जेव्हा एखाद्या ठिकाणी गाव तलावाचे काम सुरु आहे, दुरुस्ती सुरु आहे, गाळ उपसणे सुरु आहे, अश्या बातम्या कळतात तेव्हा सुखद आनंद होतो. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या पाणी विश्वक लढ्यात तत्परतेने गावतलाव निर्माण करणे या संकल्पनेला फार महत्व आहे. सरकारी अनुदानाने असो किंवा सामाजिक संस्थांच्या मदतीने असो पण कमीत कमी दोन एकराचा तलाव प्रत्येक गावासाठी अनिवार्य केले गेले पाहिजे. पाण्याचे असे असंख्य साठे निर्माण व्हायला हवेत. गावकर्यांमध्ये जागृती हवी. आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीसाठी गावतलावासाठी दान करावे. हे दान सत्पात्री असून हे सत्कार्य आहे. समाजामध्ये काही लोकांकडे अफाट संपत्ती आहे. त्यांनी त्यांच्याच गावात जरी तलाव निर्माण केला तर त्यांच्या जीवनाचे सोने होईल. अश्या साठ्यांमुळे जवळपासच्या विहिरींना पाणी झिरपेल, प्रत्येक तलाव भोवती "स्मृतीवनाची" कल्पना अमलात आणावी, म्हणजे अनायसे वृक्ष संवर्धन होईल.
आपल्या देशात अंदाजे तीन लाख छोटी मोठी गावं आहेत. तेवढे पाण्याचे साठे आणि स्मृतीवाने निर्माण झाली तर हे निसर्गचित्र नक्की सुंदर दिसेल. दरवर्षी उत्तर भारतात नद्यांचे पाणी प्रलय निर्माण करतात. या नद्या समुद्र सपाटीपासून ५ ते ८ हजार फुटावर वाहतात. कोठेही मोठी धरणे न बांधता " सायफन " पद्धतीने देशात अनेक ठिकाणी पाणी साठवता येईल. जगात तेलाच्या पाईपलाईन आहेत. तर ते मध्यम आपण पाण्यासाठी वापरायला हवे. त्या पद्धतीमुळे कोणतेही गावं किंवा जमीन पाण्याखाली जाणार नाही. पाणी संवर्धनाचा मोठा शत्रू म्हणजे बोअरवेल. जमिनीतील पाण्याचा फार मोठा उपसा या बोअरवेल पद्धतीने झाला आहे. भूगर्भातील पाण्याचा साठा आटत चालला आहे. जमिनीत पाणी जिरवण्याच इच्छाशक्ती किंवा जाणीव नसतांना पाण्याचा उपसा करण्याचा काय अधिकार आहे ?
रोटरी क्लब, लायन्स इंटरन्याशनल, अश्या अनेक संस्थांनी या कार्याला आग्रा क्रम द्यावा. प्राणी मात्रांचे जीव सुखावतील. हे कार्य म्हणजे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून इतिहासात नोंद होईल. सेवाभावी संस्था व धनवान लक्ष्मीपुत्रांनी हे सकारात्मक कार्य करावे ही माझी कळकळीची विंनती आहे. भारतीयांचे कोट्यावधी हात या निसर्गाचे संतुलन सांभाळतील हा विश्वास आहे.
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
No comments:
Post a Comment