अणुउर्जा प्रकल्प म्हणजे बंद बाटलीतले राक्षस
अणुउर्जा कार्यक्रमांना जागतिक स्तरावर विरोध होणे हा विचार मानवी अस्तित्वाशी निगडीत आहे. ६५ वर्षांपूर्वी अनु बॉम्बच्या रूपाने संहारक शक्ती जपान आणि संपूर्ण जगाने भयचकित होवून पहिली. लाखोंच्या संखेने लोक क्षणात नाहीसे झाले. लाखोलोक प्रभावित झाले. अनुउर्जेच्या मदतीने पुढे प्रगती झाली. भौतीकसुखासाठी प्रचंड विकास केला गेला, पण एक गोष्ट सर्व जण विसरताहेत कि अणुउर्जा म्हणजे बाटलीत बंद असलेला राक्षस आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या वेळी हा राक्षस बाहेर पडला तेंव्हा त्याने प्रचंड हाहाक्कार माजवला आहे. आज सुद्धा नेमका जपान या अणुउर्जा नामक भयानक राक्षसाच्या तावडीत सापडला आहे. भूकंप जपानला नवीन नाही, त्सुनामी हा निसर्गाच्या तांडवाचा अतिरेक आहेच पण न्यूक्लीअर रेडीएंशन मुले होणारा विनाश हे केवळ दुर्दैव म्हणावयाचे काय .
स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या सर्वच देशांमध्ये अणुउर्जा संयंत्र आहेत. छोट्याश्या जपान देशात ५५ संयंत्र आहेत. आपल्या देशात २२ संयंत्र आहेत. अजून काही नवीन उभारली जात आहेत. भारतात हिमालयाच्या रांगा, ईशांन्येची राज्ये, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि दक्षिणेकडील बराच भाग, भूकंप शक्यतेच्या पट्टयात येतो. यापूर्वी बर्याच वेळा मोठे भूकंप होवून दुखद अनुभव आलेले आहेत. त्सुनामीचे रौद्र रूप सुद्धा आपल्या देशाने अनुभवलं आहे. ७००० किलोमीटर समुद्र किनारा लाभलेल्या आपल्या देशात समुद्री लाटांमुळे नेहमीच नुकसान होत असते. पण अनुउर्जेच्या धोक्याबाबत काय ? संपूर्ण सागर तटांवर जवळ जवळ ४५ कोटी लोकसंख्या आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर उद्भवलेल्या रेडीएशनच्या धोक्याला प्रगत राष्ट्र सुद्धा यशस्वी तोंड देवू शकलेली नाहीत. निसर्गापुढे कुणीही शक्तिमान नाही. न्यूक्लीअर रेडीएंशन हि केवळ मानव निर्मित आपत्ती आहे. संपूर्ण जग प्रत्येक वेळी आश्या राक्षसी आपत्तीला कसेकाय तोंड देणार आहेत ? कितीवेळा विषाची परीक्षा बघायची आहे ? पृथ्वीच्या पाठीवर हे घातक विषारी साठे नको. हेच निसर्गाने आपल्या कृतीने दाखवून दिले. हि धोक्याची घंटा आम्हाला समजत नाही. काय कामाची हि बुद्धिमत्ता !
करोडो जीवांची क्षणात राख रांगोळी होऊ शकेल अशीचूक कोणाच्याही हातून होऊ नये. अनुउर्जे ऐवजी जलउर्जा, पावनउर्जा, सौरुर्जेचा वापर का होऊ शकत नाही, यावर संशोधन व्हावे. मुळात संहारक असलेली अणुउर्जा कधीही धोकेदायक ठरू शकते. जागतिक स्तरावर न्यूक्लीअर एनर्जी विरोधात एकत्रित जनमत उभे राहिले पाहिजे. आण्विक संकट समूळ नष्ट करणे हि आजची प्राथमिकता आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्तीने अनुउर्जे विरोधात आग्रही मत मांडणे आवश्यक आहे. जगण्याचा हक्कासाठी अणुउर्जा प्रकल्पांना स्पष्ट विरोध हवा.
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती - ४४४६०६
फोन : ०७२१ - २५६७४६३, ९४०५३४९३५४.
www.suhassohoni.blogspot.com
1 comment:
Please give me more brief idea to know more. Atul
Post a Comment