Friday, April 3, 2009

७२ लाख ८० हजार कोटि

स्विस बंकेतिल सीक्रेट बैंक अकाउन्ट्स मधे भारतीयांचे थोड़े थोडके नव्हेतर ७२ लाख ८० हजार कोटि रुपये ठेवलेले आहेत, ही बातमी विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविली गेली. जगात इतर कही बंकेमधे आजुनही कोट्यवधी रुपये ठेवलेले असणार। वेळोवेळी मोठ मोठ्या रकमा भरता बाहेर का जाऊ शकल्या ? ही खाती कोणाची आहेत ? भरता बाहेर जमा करण्यात आलेला हा खजिना प्रमाणिक पणे महेनतीच्या कमाईचा असू शकतो ? की वाम मार्गाने भ्रष्टाचाराच्या जादूच्या छडीच्या प्रभावाने प्राप्त केला असेल ? एकीकडे देशभर नित्य विविध आर्थिक पकेजेस जाहिर होतात पण तलागालातील जनतेला ती मदत मिळत नही। सरकारच्या तिजोरीत खाद्खादत असल्याचे सांगुन कितीतरी चागल्या योजना प्रलंबित आहेत, मग भारताबाहेर ७२ लाख कोटि रुपये का पडून आहेत ?

ही अफाट रक्कम भारतात परत यायला हावी। ही संपत्ति जाहिर व्हायला हावी। आर्थिक मंदीच्या काळात या रकमेची देशाला गरज आहे। भारताबाहेर जर ही अफाट संपत्ति गुप्त स्वरूपात व अनुत्पादित पडून आहे तर आपला देश गरीब नक्कीच नाही, मग भारतात गरीबी का आहे ? हे फसवा आर्थकारण आहे। सामान्य मानुस रोजच्या गरजाच्या मागे धावातान्ना व्यस्त आणि तरसता आहे। युवा पीढी रोजगाराच्या सम्स्येत ग्रस्त आहे किंवा कोणातरी नेत्याच्या मागे त्यांचे सैनिक म्हानावुन घेत फिर्ताहेत।

प्रत्येक उमेदवाराने आपली सर्व संपत्ति स्वतः घोषित करावी । मतदारांनी तसा आग्रह धरावा देशाबाहेर वालावुन नेलेल्या संपत्ति चा देशाच्या विकासाला के फायदा । आणि ज्यांच्या ताब्यात ही संपत्ति आहे त्यांचा तरी देशाला के फायदा ? हे आसेच चालू राहणार का ? भविष्यातील नेतृत्वा देशाचे ७२ लाख ८० हजार कोटि रुपये स्विस बन्केतुं भारतात परत आनेल ? हे राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा असून केवल निवाद्नुकिपुर्ता मर्यादित कलासथी नसावा। जनतेत या विषयी जागरण होण्याची गरज आहे । हे विचार आपण आपल्या सम्पर्कातिल मित्रांना जरुर कालवा ।

सुहास सोहोनी
अमरावती
०३.०४.२००९
राम नवमी

No comments: